Mon, Aug 26, 2019 14:42होमपेज › Aurangabad › सिल्लोड तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी; खेळणा, वाघूर व जुई नदीला पूर

सिल्लोड तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी; खेळणा, वाघूर व जुई नदीला पूर

Published On: Jul 21 2019 12:24PM | Last Updated: Jul 21 2019 12:24PM
सिल्लोड : प्रतिनिधी

औरंगाबादसह तालुक्यात काल, शनिवारी सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र समाधानकारक हजेरी लावली आहे. एका दिवसात सरासरी ५२.५० मिमी इतका तर एकूण २६६.९९ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील खेळणा, वाघूर व जुई या तीन नद्यांना पूर आला होता. तालुक्यातील अंभई १०३ मिमी, अजिंठा ९५ मिमी तर गोळेगाव ९१ मिमी या तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 

सिल्लोड तालुक्यात तब्बल पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने काल, पुन्हा हजेरी लावली. अंभई, अजिंठा व गोळेगाव या तीन मंडळात तर अतिवृष्टी झाली. सिल्लोड १० मिमी, भराडी २८ मीमी, आंमठाना ४७ मिमी, निल्लोड २२मिमी व बोरगाव बाजार २६ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील केळगाव लघु प्रकल्प ७२ टक्के, अजिंठा - अंधारी मध्यम प्रकल्प ६५ टक्के, खेळणा मध्यम प्रकल्प ०५ टक्के, हळदा - जळकी ४ टक्के, रहिमाबाद १.४९ टक्के, तर उंडनगांव जोत्याच्या खाली असून चारणा व निल्लोड दोन्ही मध्यम प्रकल्प अद्यापही कोरडेठाक पडलेले आहे.