Wed, Apr 24, 2019 07:41होमपेज › Aurangabad › डिसेंबरअखेर राजकीय उलथापालथ : महसूलमंत्री

डिसेंबरअखेर राजकीय उलथापालथ : महसूलमंत्री

Published On: Dec 02 2017 1:31AM | Last Updated: Dec 02 2017 1:31AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः विशेष प्रतिनिधी

डिसेंबरअखेर राज्यातील राजकीय अस्थैर्य संपेल, असे वक्तव्य करून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे राजकीय उलथापालथीचे संकेत दिले.

‘राज्य सरकारची तीन वर्षे शिवसेनेबरोबर भांडणातच गेली. शिवसेनेकडून वारंवार सरकारचा पाठिंबा काढण्याच्या धमक्या दिल्या जातात, मात्र आम्ही त्यांना तोंड देण्यासाठी समर्थ आहोत. विधान परिषद निवडणुकीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मी भेट घेतली. घरातील भांडणे घरातच मिटवा, त्याची जाहीर वाच्यता करू नका, असा संदेश आपण त्यांना यावेळी दिला,’ असे पाटील यांनी सांगितले.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल 18 डिसेंबर रोजी हाती येतील. तत्पूर्वी नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी विधान परिषदेची पोटनिवडणूक होईल. त्यानंतर राज्यातील राजकीय अस्थैर्य संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.