Sun, Apr 21, 2019 05:46होमपेज › Aurangabad › ‘मला खूप  छळलंय, त्यांनाही छळा’

‘मला खूप  छळलंय, त्यांनाही छळा’

Published On: Mar 01 2018 9:44AM | Last Updated: Mar 01 2018 9:44AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘त्यांनी मला खूप छळलंय. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी जीव देत असून त्यांचाही प्रचंड छळ करा’ अशी सुसाइड नोट लिहून ठेवत एकाने मृत्यूला कवटाळले. व्याजाच्या पैशांतून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून 27 फेब्रुवारी रोजी या प्रकरात पती-पत्नीविरुद्ध सातारा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पाटोदा गावात हा प्रकार घडला.

वाचा : शिवजयंतीवरून औरंगाबादमध्ये तुंबळ हाणामारी

शानील माणिक पिंपळे आणि सुरेखा शानील पिंपळे अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या दांपत्याची नावे आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले की, कडूबा जयवंता पेरे असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून या प्रकरणात त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मुलगा जयकुमार कडूबा पेरे (21, रा. पाटोदा, ता. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली की, कडूबा पेरे यांनी शानील पिंपळे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या बदल्यात त्यांना घराची नोटरी करून दिली होती. दरम्यान, या व्याजाच्या पैशांत घर बळकावण्याची धमकी पिंपळे दाम्पत्याने पेरे यांना दिली. तसेच, ते पैशांसाठी सतत त्रास देऊ लागले होते. त्यांचा त्रास सहन न झाल्याने 24 फेब्रुवारी रोजी कडूबा पेरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. यात आरोपींनी पैशांसाठी खूप त्रास दिलाय. त्यांनाही तितकाच त्रास द्या, असे म्हटलेले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक भारत काकडे यांनी दिली. या सुसाइड नोटवरूनच गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुशीला खरात अधिक तपास करीत आहेत. 

वाचा : चोर समजून मारहाण; एकजण मृत्युमुखी