Thu, Jun 27, 2019 02:21होमपेज › Aurangabad › ‘कंत्राटी’चे चॉकलेट अन्‌ तरुणांच्या भविष्याशी खेळ 

‘कंत्राटी’चे चॉकलेट अन्‌ तरुणांच्या भविष्याशी खेळ 

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 4:52PMऔरंगाबाद : रवी माताडे

जिल्ह्याचा डोलारा सांभाळणार्‍या महसूल विभागातील लिपिक ते शिपाई, तसेच नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांचे तरुणांना आकर्षण आहे. गेल्या तीन-एक वर्षात महसूलची भरतीच झालेली नाही. सेवानिवृत्ती तसेच वाढत्या कामाच्या ताणांमुळे निर्माण होणारे प्रश्‍न सोडवण्यासाठी कंत्राटी पदे भरून वेळ मारून नेली जात आहे. कंत्राटी पदांचे हे चॉकलेट देऊन तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. 

वाचा  : डमी उमेदवारांनी लाटल्या सरकारी नोकर्‍या
पॅकेज तर सोडा, सहा हजारांत मिळतात इंजिनीअर

महसूल विभागात लिपिक, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, वाहनचालक, शिपाई आदी कर्मचार्‍यांची पदे तसेच नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आदी अधिकारीवर्गाची पदे भरली जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पदांसाठी नोकरभरती झालेली नाही. दुसरीकडे दरवर्षी विविध संवर्गातून सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांची संख्या 15-30 च्या घरात आहे. शिवाय कार्यालयात कलम चालवण्याचे काम कमी होऊन संगणकीकरण वाढले आहे. जुन्या काळातील कर्मचार्‍यांना संगणकांवरील काम फारसे जमत नाही. अनेकांनी मोठ्या प्रयत्नांनी संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले, मात्र मराठी, इंग्रजी टायपिंगची गती नाही. परिणामी प्रशासनाच्या कामाची गतीही संथ झाली आहे. ही गती वाढवण्यासाठी आधुनिकतेची जाण असलेल्या तरुणांची  गरज निर्माण झालेली आहे. रोहयो, सिंचन विहिरी, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय महामार्गांचे भूसंपादन व इतर कामे आदी महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी मानधन तत्त्वावर नेमले आहेत. यात डाटा एन्ट्री ऑपरेटर, सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक आदी पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जातात. या कर्मचार्‍यांना 6 ते 14 हजारांचे मानधन दिले जाते. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी तत्त्वावर पदे भरलेली आहेत.

वाचा : ‘यूपीएससी’ला घरघर; बँकांतही आऊटसोर्सिंग
कौशल्य पणाला लावूनही बेरोजगार