Sun, Nov 18, 2018 02:51होमपेज › Aurangabad › प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे रोजगार गेला

प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे रोजगार गेला

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:14AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

प्लास्टिक बंदी हा निर्णय पर्यावरणासाठी दिलासादायक जरी असला तरी, या उद्योगावर अनेक कुटुंबे आपले पोट भरतात. प्लास्टिक बंदीने मोठ्या संख्येने लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. प्लास्टिक पिशव्या निर्माण करणार्‍या कंपन्यांपासून होलसेलर ते सामान्य रिटेलर व्यावसायिक या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत. प्लास्टिक बंदीने माझे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले असून आता पोट कसे भरावे असा प्रश्‍न पडला असल्याची व्यथा प्लास्टिक पिशव्या विकून आपले पोट भरणार्‍या व शरीराने अपंंग असलेल्या संतोष अहेर यांनी व्यक्‍त केली.

संतोष अहेर हे दोन्ही हातांनी अपंग आहेत. दुसरे कोणतेही काम करणे शक्य नसल्याने अनेक वर्षांपासून ते प्लास्टिक पिशव्या होलसेलर व्यापार्‍यांकडून खरेदी करून भाजीमंडईतील किरकोळ भाजीविके्रत्यांसह किराणा दुकानांत विकून ते आपला उदरनिर्वाह  भागवितात. घरभाडे जाऊन कुटुंबाचे उदरभरण होईल एवढी कमाई त्यांची दिवसभराची होत होती. सायकलवर पिशव्या टाकून सायकल लोटत ते दिवसभर हा व्यवसाय करीत. त्यांना फिट येण्याचा त्रास आहे. प्लास्टिक बंदीने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अपंग असल्याने त्यांचेकडून दुसरे कोणतेही जड काम होऊ शकत नाही. सध्या ते काम शोधत असून कुटुंबांच्या पालनपोषणाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. चहाविक्रेते किंवा हॉटेलवाल्यांकडे काम मागायला जात आहे. मात्र, ते फक्‍त 50 ते 100 रुपये दिवसभराच्या कामासाठी देऊ करीत असल्याची व्यथा त्यांनी सांगितली.