Sat, Jul 20, 2019 02:12होमपेज › Aurangabad › दहा महिन्याच्या चिमुकल्याची हत्या, ड्रममध्ये आढळला मृतदेह 

दहा महिन्याच्या चिमुकल्याची हत्या, ड्रममध्ये आढळला मृतदेह 

Published On: Jun 24 2018 6:15PM | Last Updated: Jun 24 2018 7:23PMपानरांजणगाव (खुरी) : प्रतिनिधी 

शनिवारी सायंकाळी पैठणखेडा या गावात  १० महिण्याच्या बाळाचे अपहरण झाल्‍याने कुटुंबाने तशी तक्रार पोलिस स्‍टेशनमध्ये दाखल केली होती. पोलिसांनी परिसरात श्वान पथकाच्या मदतीने शोध मोहीम राबविली असता, बालकाचा मृतदेह घराजवळच्याच ड्रममध्ये आढळला. यामुळे खळबळ माजली आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी, लिंबादास खैरे यांची मूलगी गिरजा ही मुळची गंगापूर तालुक्यातील आहे. मात्र कामानिमित्त ती चीतेगाव येथे पती सोबत राहते. शनिवारी सायंकाळी मुलगा प्रेम परमेश्वर एरंडे या १० महिण्याच्या मुलाला सोबत घेऊन माहेरी पैठणखेडा येथे ती आली होती. रात्री जेवण करून झाल्‍यावर ती आपल्‍या मुलाला जवळ घेउन  झोपली होती. गिरजाला रात्री जाग आल्‍यावर उठून पाहिले असता, तीला शेजारी झोपलेला मुलगा दिसल नाही. 

 मुलगा नसल्याच़ समजताच कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही. शेवटी कुटुंबियांनी शनिवारी रात्री बिड्किन ठाण्यात १० महिण्याच्या बालकाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. तर ठाण्याचे सपोनि पंडित सोनवणे यांनी गावात व परिसरात शोध घेतला पण त्‍यांना यश आले नाही. तेव्हा आज रविवार सकाळी औरंगाबाद येथून श्वान पथक बोलाऊन घेत शोध मोहीम राबविली असता, घराजवळच्या छोट्या ड्रम जवळच श्वान घुटमळत असल्‍याने पोलिसांनी ड्रम उघडून पाहिला असता, त्यात मूल पाण्याच्या ड्रममध्ये मृत अवस्‍थेत आढळून आले. 

त्‍याला  बिड्किन घाटीत तपासले असता, मृत म्‍हणून घोषित केले. या घटनेने कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. या घटनेवरून पोलिसांनी  संशयावरून  जवळच्या तीन ते चार नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.