Sat, Jun 06, 2020 19:40होमपेज › Aurangabad › पैठण : नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

पैठण : नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

Published On: Sep 07 2018 4:38PM | Last Updated: Sep 07 2018 4:38PMपैठण : प्रतिनिधी

नरभक्षक बिबट्याने मौजे गोपीवाडी व वाघाडी ता. पैठण शिवारात धुमाकूळ घातला आहे. गोपीवाडी शिवारामध्ये भारत ठेणगे (वय ५०वर्ष) या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्‍ला केला होता. या हल्यात दि ६ रोजी गुरूवारी राञी मुंडके नसलेला मृतदेह  मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

या घटनेत मृत्‍युमुखी पडलेल्‍याच्या मृताच्या नातेवाईकांनी माञ याबतीत हलगर्जीपणा करणार्‍या संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल केल्या शिवाय शवविच्छेदनासाठी आनलेला मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत पैठण येथील शासकीय रूग्णालयामध्ये गोंधळ घातला. यावेळी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर शुक्रवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास वनविभागाचा पथकाला घटना स्थळापासून जवळच असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये भारत ठेणगे यांचे शरीरा पासून वेगळे झालेले मुंडके मिळाले आहे. घटनेचे गाभीर्य बघता पोलिस निरीक्षक चंदन ईमले यांनी  शासकीय रूग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तर तहसिलदार महेश सावंत, उपवन संरक्षक ए.पी.वडसकर,यांनी तातडीने धाव घेत मयत ठाणगेचे नातेवाईक व जमावाला शांत केले व तातडीची मदत म्हणून १० लाखा पैकी ३ लाख रूपये मयताच्या दोन मुलांच्या नावे धनादेश देण्यात आले असुन, ७ लाख रूपये सोमवार पर्यंत वारसांना देण्यात येणार असल्याची माहिती उपवन संवरक्षक ए.पी.वडसकर यांनी दिली आहे. 

नरभक्षक बिबट्याला दिसताक्षंणी ठार मारण्याचे आदेश नागपूर येथील वरीष्ठ कार्यालयाने परवानगी दिली आहे. यासाठी १६ कर्मचारी व अधिकार्‍यांचे दोन पथक स्थापन करण्यात आले असुन, त्यांच्या माध्यमातुन नरभक्षक बिबट्याचा युध्दपातळीवर शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. बिबट्या दिसताचक्षणी ठार मारण्याचे आदेश संबंधीत पथकास  देण्यात आले आहेत.