Fri, Jul 19, 2019 05:01होमपेज › Aurangabad › पॅकेजिंग कंपनीस आग, 8 कोटींची हानी

पॅकेजिंग कंपनीस आग, 8 कोटींची हानी

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 1:24AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका पॅकेजिंग कंपनीला मंगळवारी (दि. 15) मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. या घटनेत मशिनरी, रॉ-मटेरिअल पूर्णपणे जळून खाक झाल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज कंपनीच्या मालकाने व्यक्‍त केला आहे.अधिक माहितीनुसार बनकरवाडी गट नं. 41 मध्ये संजय भाताडे यांची केदारनाथ पॅकेजिंग इंडस्ट्रिज ही कंपनी असून तेथे  लाकडी प्लेट, तसेच मशिनरी पॅकिंगसाठी लागणारे लाकडी बॉक्स तयार करण्यात येतात. या कंपनीत 40 कामगार काम करतात. दोन दिवसांपूर्वी भाताडे हे कुटुंबासह रत्नागिरीला गेले होते. यामुळे कंपनीचे काम त्यांचा भाऊ सचिन भाताडे हा पाहत होता.

मंगळवारी कंपनीत जास्त काम असल्यामुळे 4 कामगार रात्री साडे 11.30 वाजेपर्यंत कंपनीत काम करून घरी निघून गेले. मुख्य प्रवेश द्वाराजवळ सुरक्षा रक्षक रामदास सोमासे हा ड्युटी करत होता. रात्री 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास कंपनीतून अचानक धूर निघत असल्याचे त्यांना दिसून आले.  मात्र तोपर्यंत कंपनीतील फर्सन मिशन, जनरेटर आदी मशिनरी तसेच मोठ्या प्रमाणात असलेले लाकडी रॉ-मटेरियल जळून खाक झाल्याने 7 ते 8 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे भाताडे यांनी सांगितले.