Sat, Nov 17, 2018 02:27होमपेज › Aurangabad › रोजगार फक्‍त जय शहालाच मिळाला

रोजगार फक्‍त जय शहालाच मिळाला

Published On: Feb 12 2018 1:48AM | Last Updated: Feb 12 2018 12:52AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

भाजपनेे 2014 च्या निवडणूक जाहीरनाम्यात 6 कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्‍वासन जनतेला दिले होेते, मात्र साडेतीन वर्षांत काही लाखही रोजगार निर्माण करता आला नाही. आता सुशिक्षीत बेरोजगारांना पकोडे विकायचे सांगत आहेत. जर कोणाला रोजगार मिळाला असेल तर तो जय शहा याला. त्याची संपत्ती 50 लाखांवरून 80 कोटींपर्यंत गेल्याचे वक्‍तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी रविवारी (दि.11) येथे केले. राष्ट्रवादी युवक काँगे्रसतर्फे अमित शहा यांचे पकोडा विकण्याच्या वक्त्याचा निषेध म्हणून सिडको येथे प्रतिकात्मकरित्या अमित शहा पकोडा सेंटर सुरू केले आहे. याची पाहणी आ. धनंजय मुंढे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे विनोद पाटील, अभिजित देशमुख, दत्ता भांगे, राहुल येडे, संदीप कानडे, अफरोज पटेल, बाळासाहेब औताडे, रहिम पटेल, अक्षय शिंदे, गजानन पाटील, कैलास कुटे, मयूर सोनवणे, श्रीकांत बोराडे, विकास ठाले, बलदेव बोंबले,  शुभम गाडेकर, रवींद्र काळे, मयूर कुर्‍हाडे, शेख असिफ आदींची उपस्थिती होती.

 मोदी सरकारने सुशिक्षित बेरोजगारांचा अपमान केला आहे. यामुळे हेच युवक 2019 च्या निवडणुकीत भाजपला खाली खेचतील, असे मुंढे म्हणाले.