Sun, Dec 08, 2019 18:37होमपेज › Aurangabad › ‘एफडीए’च्या नवीन इमारतीचे उद्या उद्घाटन 

‘एफडीए’च्या नवीन इमारतीचे उद्या उद्घाटन 

Published On: Sep 12 2019 9:53AM | Last Updated: Sep 12 2019 9:17AM

 अन्न व औषध प्रशासन (एफडीए) संग्रहित छायाचित्र.औरंगाबाद : प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागीय कार्यालय व प्रयोगशाळेच्या नवीन इमारतीचे शुक्रवारी (दि.13) उद्घाटन होणार आहे. पैठण रोड कांचनवाडी येथील गट नं.१९ मध्ये हे नवीन कार्यालय उभारण्यात आले असून सायंकाळी ५  वाजता उद्घाटन सोहळ्याला सुरूवात होईल. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल हे उद्घाटक असतील. विशेष उपस्थितीत पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री मदन येरावार, राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, खा. राजकुमार धुत, खा. इम्तियाज जलील हे असतील. या उद्घाटन सोहळ्यासाठी अन्न व औषध प्रशासन राज्य आयुक्‍त डॉ. पल्लवी दराडे, औरंगाबाद विभागाचे सहआयुक्‍त उदय वंजारी, सहआयुक्‍त (औषधी) सु.स. मोहीते, सहाय्यक संचालक एफडीए प्रयोगशाळा शंकर चेंदवणकर हे परिश्रम घेत आहेत.