Fri, Apr 26, 2019 18:14होमपेज › Aurangabad › स्टील बॉडी बसच्या बांधणीला वेग

स्टील बॉडी बसच्या बांधणीला वेग

Published On: Jun 25 2018 1:45AM | Last Updated: Jun 25 2018 1:21AMऔरंगाबाद : जे. ई. देशकर

चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतून आता केवळ स्टील बॉडीच्या बसचीच बांधणी होत असून पंढरपूर यात्रेपर्यंत आठ बस बांधणीचे काम केले जाणार आहे. या बसेस मराठवाड्यातील सात जिल्ह्यांत वितरित करण्यात येणार आहेत. यावर्षी पंढरपूर यात्रेसाठी तिन्ही कार्यशाळेतून स्टील बॉडीच्या बसेस देण्यात येणार आहेत, अशी माहिती कार्यशाळा प्रमुख उद्धव काटे यांनी दिली. 

स्टील बॉडीच्या बस बांधणीला आता वेग आला असून सध्या एकाच वेळी सहा बस बांधणीचे काम हातावर घेण्यात आले आहे. त्यांचे सांगाडे उभारण्याचे काम जोरात सुरू असून या गाड्या पंढरपूर यात्रेच्या आत तयार करण्याचे नियोजन येथील अधिकार्‍यांनी केले आहे. या वेळेच्या आत तयार करून त्या-त्या जिल्ह्याला या गाड्या देण्यात येणार आहे. या गाड्या औरंगाबाद-1, परभणी-2, नांदेड-1, उस्मानाबाद-1, बीड-1, जालना-1 आणि लातूर-1 या ठिकाणी देण्यात येणार आहेत. 

दुसरी बस तयार : येथील अधिकारी कर्मचार्‍यांनी दुसर्‍या स्टील बॉडीच्या बसच्या बांधणीचे काम काही दिवसांपूवीच हाती घेतले होते. हे काम संपत आले असून केवळे खिडक्या बसवण्याचे काम शिल्लक आहे. तीन ते चार दिवसांत काम संपवून दुसरी गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यानंतर मात्र एकदम सहा बसेसच्या बांधणीचे काम हाती घेतल्याने आणि त्या वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने या बसेस बांधणीला वेग येणार आहे. या बसेसची बांधणी करण्यासाठी मुख्य पार्ट असलेल्या वेल्डिंग मशीन नुकत्याच दाखल झाल्या असून त्यामुळे सांगाडा उभारण्याच्या कामाला वेग आला आहे.