Wed, May 22, 2019 10:59होमपेज › Aurangabad › दुचाकी अपघातात एक ठार 

दुचाकी अपघातात एक ठार 

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 16 2018 2:16AM

बुकमार्क करा
सिल्‍लोड :

समोरून येणार्‍या वाहनाने हूल दिल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला तर अन्य एक जखमी झाल्याची घटना अंभई-पागरी रस्त्यावर हट्टी शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. निवृत्ती पंडित दांडगे (20, रा.चारनेर ता.सिल्‍लोड) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून बबन बाबूराव लेणेकर (20) असे जखमीचे नाव आहे. दोन्हीजण दुचाकीने (एमएच 20ईएम 5896) अंभई कडून चारनेर जात असताना दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. अपघाताची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक सांडू जाधव, बाबूराव साबळे करीत आहेत.