Thu, Apr 25, 2019 21:37होमपेज › Aurangabad › तिहेरी अपघातात एक ठार 

तिहेरी अपघातात एक ठार 

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 12:01AMवाळूज : प्रतिनिधी

मुख्य महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टरला पाठीमागून टाटा टेम्पोने तर त्या टेम्पोला पुन्हा पाठीमागून येत असलेल्या मालवाहू ट्रकने जोराची धडक दिली. या तिहेरी अपघातात एकजण ठार तर अन्य एक जखमी झाला आहे. रविवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास लिंबेजळगाव टोलनाक्याजवळ ही घटना घडली. रविपाल नरेंद्रपाल (रा.दार्जिलिंग,पश्‍चिम बंगाल) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लिंबेजळगाव टोलनाक्यालगत मुख्य महामार्गावर ऊस भरलेला विनाक्रमांचे एक नादुरुस्त टॅक्टर रस्त्यावर उभा होता. त्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणार्‍या टाटा टेम्पोने (एम.एच. 04-एजे-2301)  जोरात धडक दिली. हा टेम्पो पुणे येथून रोपे घेऊन बंगालकडे जात होता. दरम्यान या टेम्पोला पाठीमागून येणार्‍या मालवाहू ट्रकने (एपी-16-टीव्ही-1836) धडक दिली. हा ट्रक घोडेगाव (जि.नगर) येथून कांदा घेऊन आंध्रप्रदेशकडे जात होता. या अपघातात टाटा टेम्पोमधील रविपाल नरेंद्रपाल व गोरख लक्ष्मण रणसुरे (रा.हडपसर, पुणे) जखमी झाले. गंभीर जखमी रविपाल यास पुढील उपचारासाठी वाळूज पोलिसांनी घाटीत दाखल केले. डॉकटरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. वाळूज पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर हे करीत आहेत.