Sat, Apr 20, 2019 15:59होमपेज › Aurangabad › ऑटोमोबाईल विषयात ओमकेश पवार राज्यात प्रथम

ऑटोमोबाईल विषयात ओमकेश पवार राज्यात प्रथम

Published On: Jun 08 2018 6:29PM | Last Updated: Jun 08 2018 6:29PMअंधारी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी (दि. ८) रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या निकालात अनेक राज्यात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले आहे. मात्र औरंगाबाद येथील अंधारी प्रशालेच्या ओमकेश सोमीनाथ पवार याने ऑटोमोबाईल विषयात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  

अंधारी प्रशालेतील ११३ परीक्षार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यात १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ६४ विद्यार्थी विशेष प्राविण्य तर २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. ऑटोमोबाईल या विषयामध्ये ओमकेश याने १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम येणाचा मान मिळवला आहे. तर, प्रशालेतुन नीता रामदास पांडव हि 94.20 टक्के मिळवत प्रथम, तर शुभम नारायण पांडव -93.60% द्वितीय आणि ओमकेशने 91.80 गुण मिळवत तृतीय क्रमांकावर बाजी मारली.

उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विठ्ठल भीमराव तायडे व उपाध्यक्ष अनिता गणेश घडमोडे, सर्व सदस्य व प्रशालेच्या मुख्याध्यापिका आनंदीबाई माने यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.