Tue, May 21, 2019 00:32होमपेज › Aurangabad › सिल्‍लोड : स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीच्या अंत्यविधीस गैरहजर

मंडळ अधिकार्‍याला बजावली नोटीस 

Published On: Dec 19 2017 1:18AM | Last Updated: Dec 19 2017 12:48AM

बुकमार्क करा

सिल्लोड : प्रतिनिधी 

स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीच्या अंत्यविधीस गैरहजर राहिल्याप्रकरणी मंडळ अधिकार्‍यास तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  

तालुक्यातील शिवना येथील स्वातंत्र्य सैनिक काशिनाथ राऊत यांच्या पत्नी गीताबाई यांचे 10 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 11 डिसेंबरला रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यविधीला मंडळ अधिकारी काझी यांना हजर राहणे नियमानुसार गरजेचे होते, मात्र ते हजर राहू शकले नाहीत, दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन राऊत यांनी तहसीलदार संतोष गोरड यांच्याकडे तक्रार नोंदविली.

या तक्रारीवरून गोरड यांनी तलाठी जरारे व मंडळ अधिकारी काझी यांना सदर अंत्यविधीस जाण्याची सूचना केली होती. तलाठी जरारे हे अंत्यविधीला हजर राहिले, मात्र काझी यांनी गैरहजर राहिले. दरम्यान, तहसीलदार गोरड यांनी याबाबत मंडळ अधिकारी काझी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून नोटिसीचे उत्तर मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. 

याप्रकरणी मी मंडळ अधिकारी काझी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीबाबत खुलासा केल्यानंतर काझी यांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांना पत्र पाठविले जाणार आहे. - संतोष गोरड, तहसीलदार, सिल्‍लोड.