Thu, Jan 17, 2019 18:25होमपेज › Aurangabad › विनापरवाना मांसविक्री करणार्‍या २० जणांना नोटिसा  

विनापरवाना मांसविक्री करणार्‍या २० जणांना नोटिसा  

Published On: Dec 18 2017 2:28AM | Last Updated: Dec 18 2017 12:02AM

बुकमार्क करा

पैठण ः प्रतिनिधी 

शहरातील विविध भागामध्ये उघड्यावर मांस विक्रीचा व्यवसाय विनापरवानगी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर याबाबत गंभीर दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी 20 मांसविक्रेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत. आपल्या दुकाना बंद का करण्यात येऊ नयेत, असा उल्‍लेचे नोटीसीत करण्यात आला आहे.  

शहामध्ये विविध भागामध्ये न. प. प्रशासनाची परवानगी न घेता खुलेआम रस्त्यावर बैल, बकरा, कोंबडीची मांसविक्री केली जात असून मांस विक्रीचे टाकाऊ मांस, कोंबडीचे पंख व इतर अवयव जायकवाडी धरण परिसरातील दक्षिण काशी मैदानात येथे टाकले जात आहे. त्यामुळे  या ठिकाणी मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पहाटे फिरायला जाणार्‍या नागरिकांना या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे.  आपली दुकाना बंद न केल्यास  त्यालार सील करून फौजदार गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा नोटीसीव्दारे देण्यात आला आहे.