Tue, Nov 13, 2018 10:09होमपेज › Aurangabad › पुन्हा भाजपसोबत अजिबात नाही : राजू शेट्टी 

पुन्हा भाजपसोबत अजिबात नाही : राजू शेट्टी 

Published On: May 05 2018 12:48AM | Last Updated: May 05 2018 12:34AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नरेंद्र मोदी आणि भाजपने आमचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे यापुढे पुन्हा निवडणुकांमध्ये त्यांच्यासोबत जाणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी औरंगाबादेत निक्षून सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शेतकरी सन्मान यात्रा औरंगाबादेत दाखल झाली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाबरोबर जायचे, हे अद्याप ठरवलेले नाही. सर्वच पक्षांपासून सध्या आपण समान अंतर राखून आहोत.