Sun, Aug 25, 2019 03:38होमपेज › Aurangabad › तेरी गलियों में ना रखेंगे कदम!

तेरी गलियों में ना रखेंगे कदम!

Published On: Mar 15 2018 4:27PM | Last Updated: Mar 15 2018 5:23PMऔरंगाबाद :  प्रतिनिधी 

औरंगाबादमधील कचरा प्रश्न लवकर सुटावा, शहरातील अनेक कामे पूर्ण करण्याची इच्छा होती. पण, सक्तीच्या रजेवर पाठवायच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ही कामे आता नवीन अधिकारी पूर्ण करतील असा आशावाद व्यक्त करत, पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही, असे मत पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी व्यक्‍त केले. 

गेल्‍या पंधरा दिवसांपासून औरंगाबादमध्ये कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्‍यावरुनच मिटमिटा भागात दंगल झाली होती. यावेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला करावा लागला होता. या घटनेमुळे यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

आपल्या सव्वातीनशे दिवसांच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचा दावा करताना यादव म्हणाले, ''शहरात 400 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यातून अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांना या घटनांचा छडा लावण्यात यश आलं. सव्वाशे कोटी रुपयांचा निधी शहरात सीसीटीव्हीसाठी आलेला आहे. ते काम पूर्ण करायच होतं. आता नवीन अधिकारी त्या कामाला गती देतील, असा आशावाद व्यक्त करत औरंगाबादमधील कामाचा आशावाद चांगला राहिला. आता पुन्हा औरंगाबादेत येण्यापेक्षा नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करायला आवडेल. इथं आल्यानंतर पूर्वग्रह दूषित मनाने काम केले जाईल. असा ठपका ठेवला जाईल म्हणून पुन्हा औरंगाबादमध्ये येणे नाही.'' 

मिटमिटा भागात पोलिसांनी जी दगडफेक केली होती. त्याची चौकशी सुरू असून, यापुढे ती सुरू ठेवायची का नाही?. याबाबत नवीन येणारे अधिकारी निर्णय घेतील, असं यादव म्हणाले. येणाऱ्या वर्षात लोक अनेक मुद्द्यांवर रस्त्यावर येतील. त्यामुळे कायद्याचा प्रश्न निर्माण होईल. आशा वेळी पोलिसांच मनोबल वाढायला हवं, ते वाढलं तरचं सर्व अबाधित राहील आणि सरकारी मालमत्तेच नुकसान होणार नाही. त्यासाठी मनोबल खच्ची व्हायला, नको असं यादव म्हणाले.

यामुळे म्हणाले आता औरंगाबाद नको
इथं आल्यानंतर पूर्वग्रहदूषित मनाने काम करतात, असा ठपका ठेवला जाईल म्हणून पुन्हा औरंगाबादमध्ये येणे नाही. उलट पुढे नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करायला आवडेल. मुख्यमंत्र्यांकडे येथे पाठवू नका, अशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अशा वेळी मनोबल वाढायला हवे
मिटमिट्यात पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी यापुढे सुरू ठेवायची की नाही? याबाबत नवीन येणारे अधिकारी निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत अशा वेळी पोलिसांचे मनोबल वाढायला हवे, ते वाढले तरच सर्व अबाधित राहील आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, असेही यादव यांनी सांगितले.