Thu, Jun 27, 2019 18:41होमपेज › Aurangabad › जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील

जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील

Published On: Jun 13 2019 1:29PM | Last Updated: Jun 13 2019 1:26PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार नितीन पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली.

या निवडीसाठी आज सकाळी साडेअकरा वाजता प्रक्रिया सुरू झाली. त्याआधी सर्व १९ संचालक मंडळाच्या सदस्यांनी एकमताने निर्णय घेत अध्यक्षपदासाठी नितीन सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नितीन पाटील यांनी २ अर्ज दाखल केले. तर या सभेचे किरण पाटील डोणगावकर, दामोदर नवपुते यांनी सुचक, तर अभिजित देशमुख व रंगनाथ काळे यांनी अनुमोदन केले आहे. तर यासोबत निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या वेळेत इतर कुणाचाही अर्ज दाखल झाला नाही, त्यामुळे नितीन पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

तर अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी काम पाहिले.