Thu, Jan 24, 2019 05:50होमपेज › Aurangabad › वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाची गरज

वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाची गरज

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 12:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाने (घाटी) निधीसाठी आतापर्यंत दाखल केलेल्या सर्व प्रस्तावांवर सकारात्मक विचार केला जाईल, प्रशासनाने यावर वेळोवेळी पाठपुरावा करावा, असे आश्‍वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (दि. 27) दिले. 

सायंकाळी सात वाजेदरम्यान त्यांनी घाटीला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी आ. अतुल सावे, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आदींची उपस्थिती होती. ते म्हणाले, पूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना 200 ते 250 कोटी निधी मिळायचा आता हीच तरतूद 1200 कोटींवर पोहचली आहे. यंत्रसामग्रीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करीत राहा, असा सल्ला दिला. येणार्‍या काळात घाटीच्या सर्व अडचणी सोडविल्या जातील, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. 

नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे शासकीय यंत्र सामग्रीचा अपव्यय होतो. गरिबांच्या आणि गरजूंच्या हक्काच्या गोष्टी आपणच काढून घेतो, असे म्हणत त्यांनी अभ्यागत समिती सदस्यांना कानपिचक्या दिल्या. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हल्ली संशोधने होत नसल्याचे ताशेरेही त्यांनी यावेळी ओढले. नारायण कानकाटे, राम बुधवंत, साधना सुरडकर, रामेश्‍वर लांडगे, मुकुंद फुलारी यांची उपस्थिती होती.