Thu, Feb 21, 2019 09:17होमपेज › Aurangabad › नांदेड रेंजच्या 3 निरीक्षकांच्या औरंगाबादेत बदल्या

नांदेड रेंजच्या 3 निरीक्षकांच्या औरंगाबादेत बदल्या

Published On: May 25 2018 5:26PM | Last Updated: May 25 2018 5:21PMऔरंगाबाद : 

पोलिस महासंचालक कार्यालयाने शुक्रवारी निरीक्षकांच्या बदल्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे विनंती आणि प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून औरंगाबादेतून चार निरीक्षकांच्या बदल्या  झाल्या आहेत. बाहेरून चार निरीक्षक औरंगाबादेत येत असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. 

चारपैकी तीन निरीक्षक नांदेड परिक्षेत्रातून औरंगाबादेत येत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त म्हणून तेथील विशेष महानिरीक्षक येणार असल्याचा हा स्पष्ट इशाराच म्हणावा लागेल. यात राजकुमार  सोनवणे (लातुर), अनिल गायकवाड आणि संदीप गुरमे (दोघे नांदेड) यांचा समावेश आहे. याशिवाय उद्धव जाधव (ठाणे) येथून औरंगाबाद येथे आले आहेत. दरम्यान, निरीक्षक शिवाजी कांबळे (बुलढाणा), अविनाश आघाव (ATS, औरंगाबाद), हेमंत कदम (बीड) आणि सुरेश वानखेडे (महामार्ग सुरक्षा विभाग) यांची इतरत्र बदली झाली आहे.