Tue, Mar 19, 2019 15:34होमपेज › Aurangabad › हमीभावाचे आश्वासन म्हणजे, लबाडा घरचं आवतन : पवार

हमीभावाचे आश्वासन म्हणजे, लबाडा घरचं आवतन : पवार

Published On: Feb 03 2018 4:33PM | Last Updated: Feb 03 2018 4:33PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन 

अर्थसंकल्पात सरकारने खरिपाला दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, ते पदरात पडेल तेव्हाच खरे. भाजप सरकारचे आश्वासन म्हणणजे लबाडा घरचं आवतन आहे, ते ताटात पडेल तेव्हाच खरे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची सांगता आज, औरंगाबादमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर सभा झाली. 

पवार म्हणाले, 'या सरकारच्या काळात केवळ बेरोजगारी, महागाई पदरात दिली. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आणि जातीय तेढ निर्माण झाली. उत्तर प्रदेशमध्ये २६ जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या एका समाजाला ज्या  पद्धतीने  विरोध करण्यात आला आणि तेथे दंगल घडविण्यात आली. हेच या सरकारच्या काळातील होत आहे.' नोटाबंदीच्या निर्णयावरही पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, 'नोटाबंदीने कोणाचे भले झाले हे मला दिसले नाही. जिल्हा बँकांमध्ये जमा झालेल्या नोटांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे आणि सरकार केवळ हेच मोठे काम केल्याचे सांगत आहे.'