Sat, Jan 19, 2019 11:46होमपेज › Aurangabad › वाळूजच्या गायरानातून मुरुमाची चोरी

वाळूजच्या गायरानातून मुरुमाची चोरी

Published On: Jul 14 2018 1:17AM | Last Updated: Jul 14 2018 1:12AMवाळूज : प्रतिनिधी

वाळूज येथील रामराई रोडवरील शासकीय गायरान गट क्रमांक 361 मधून शुक्रवारी पहाटेपासून जेसीबीद्वारे दोन ट्रॅक्टरमधून सर्रास मुरूमाची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबतची पोस्ट स्थानिक व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर फोटोसह व्हायरल झाली आहे. शासनाला हजारो रुपयांचा चुना लावणार्‍या या प्रकाराकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने अखेर सरकारी मालमत्तेचा वाली कोण? हा प्रश्‍न वाळूजकरांनी उपस्थित केला आहे.

रामराई रोडवर गट क्रमांक 361 हा गट शासकीय असून त्यातील जवळपास 72 एकर जमीन सध्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. त्या जमिनीत जिल्हा परिषदेची उर्दू शाळा, स्मशानभूमीसह वाळूजगावाला पाणीपुरवठा करणार्‍या दोन विहिरी आहेत. याच गायरानात वेगवेगळ्या प्रकारची हजारो वृक्षही मोठ्या डौलाने उभी आहे. या गायरानाची देखभाल ग्रामपंचायतीकडे आहे, अशा या शासकीय गायरानातील मालमत्ता आज चक्‍क वार्‍यावर असल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी पहाटेपासून गायरानातील पाणीपुरवठा विहिरीजवळून जेसीबीद्वारे दोन ट्रॅक्टरमधून मुरूमाची चोरटी वाहतूक सुरू आहे. याकडे सवार्र्ंनीच कानाडोळा केला आहे. सदर ठिकाणी मुरूम चोरी जात असल्याची पोस्ट वाळूजच्या अनेक ग्रुपवर आजच व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे 25 फुटांचे खोलवर असंख्य खड्डे या भागात केलेले आढळून येतात. शासनाचा हजारोंचा कर बुडवून विनापरवाना होणारी ही चोरटी वाहतूक अखेर कधी थांबणार? हा प्रश्‍न वाळूजकरांतून होत आहे.