होमपेज › Aurangabad › मोबाइल कंपनीचे बनावट पार्ट्स विकणार्‍यांविरुद्ध गुन्हा

मोबाइल कंपनीचे बनावट पार्ट्स विकणार्‍यांविरुद्ध गुन्हा

Published On: Dec 14 2017 2:39AM | Last Updated: Dec 14 2017 2:38AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

आयफोन आणि बीट्स कंपनीच्या मोबाइलचे बनावट पार्ट्स विकणार्‍या चौघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या कंपनीचे फिल्ड ऑफिसर दीपक संताराम भालेराव (रा. न्यू हनुमाननगर, गारखेडा) यांनी फिर्याद दिली. एक लाख सहा हजार 680 रुपयांचे पार्ट्स जप्त करण्यात आले.

मादाराम धुकाराम चौधरी (32, रा. गुलमंडी, सुधा मोबाइल शॉपी), जैसा राम अचला राम (23, रा. समर्थनगर, श्री रामदेव मोबाइल शॉपी), नारायणसिंग जिनसिंग चौहाण (23, रा. मिलकॉर्नर, महादेव मोबाइल शॉपी) आणि प्रभाकर नीळकंठराव देशमुख (69, रा. सिंधी कॉलनी, विष्णूनगर, सोनी इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चारही आरोपींनी आयफोन आणि बीट्स कंपनीच्या मोबाइलची बनावट अ‍ॅक्सेसरीज आपल्या मोबाइल शॉपीत ठेवली. तिची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली. तसेच, कंपनीच्या अ‍ॅक्सेसरीजची कॉपी करून कंपनीचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या सर्व दुकानांमधून एक लाख सहा हजार 680 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज जप्त करण्यात आल्या. आरोपींना अटक करण्यात आली. जामीनपात्र गुन्हा असल्याने सर्वांना जामीनही मंजूर झाला.