Sun, Aug 18, 2019 20:51होमपेज › Aurangabad › पेटलेला कचरा बघून पालकमंत्री अवाक्

पेटलेला कचरा बघून पालकमंत्री अवाक्

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 12:37AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि. 1) कचरा परिस्थितीचा आढावा घेत शहराची पाहणी केली. सिद्धार्थ उद्यानातील कंपोस्ट पीटची पाहणी करून बाहेर पडत असतानाच त्यांना बसस्थानकासमोरील कचरा पेटलेला दिसला. हे बघून पालकमंत्री डॉ. सावंत अवाक् झाले. त्यांनी तत्काळ मनपा पदाधिकार्‍यांना अग्निशमनला पाचारण करण्याचे फर्मान सोडले. त्यानंतरही आग विझेपर्यंत ते तिथेच थांबले. 

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे मंगळवारी शहरात आले होते. सकाळी ध्वजवंदनानंतर त्यांनी शहरातील कचरा परिस्थितीची पाहणी केली. मनपाच्या सिद्धार्थ उद्यानाला भेट देत त्यांंनी तेथील कंपोस्टिंग पीटची पाहणी केली. उद्यानातून बाहेर येत असतानाच त्यांना मध्यवर्ती बसस्थानकासमोरील कचर्‍याचे ढीग पेटलेले दिसले. डॉ. सावंत यांनी ही आग पाहताच महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत पदाधिकार्‍यांना तत्काळ अग्निशमनची गाडी बोलावण्याचे आदेश दिले. काही वेळातच अग्निशमनची गाडी व्हॅन व जवान तेथे दाखल झाले. बंबाद्वारे पाण्याचा मारा करून अग्निशमन जवानांनी ती आग आटोक्यात आणली.

जेथे कचरा साठवून नंतर तो कचरा महापालिकेने उचलला आहे, अशा औरंगपुरा, पैठणगेट, सिल्लेखाना, किलेअर्कसह सेंट्रल बसस्थानकाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील कचरा विल्हेवाटीसाठी दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना मनपा पदाधिकार्‍यांना केल्या.