Wed, Nov 14, 2018 17:23होमपेज › Aurangabad › मातंग समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक

मातंग समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 1:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

इतिहास काळापासून मातंग समाजाची ओळख ही बलशाली समाज अशी आहे. या समाजाची भूमिका सातत्याने सन्मानाने जगण्याची राहिली आहे. शासनस्तरावर समाजाच्या असलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेत असून त्या लवकरच पूर्ण होतील, असे आश्‍वासन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे केले. 

क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेतर्फे, रविवारी (दि. 28) उस्मानपुर्‍यातील संत एकनाथ रंगमंदिरात ‘मातंग समाज राज्यस्तरीय मेळावा’ व ‘क्रांतिगुरू लहुजी साळवे समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार-2017’ चा वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, आ. अतुल सावे,  किशनचंद तनवाणी, भागवत कराड, रमेश पांडव आदी उपस्थित होते.

समाजगौरव पुरस्कारने यांना केले सन्मानित : विविध माध्यमांतून समाजाच्या विकासासाठी सातत्याने काम करणार्‍या मित्रमंडळाना मान्यवरांच्या हस्ते क्रांतिगुरू लहुजी साळवे समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये तनवाणी मित्र मंडळचे किशनचंद तनवाणी, प्रा. डॉ. बाळासाहेब वाल्हेकर, महेंद्र सोनवणे, अविनाश साळवे, प्रा. जगदीश वाघमारे, तुकाराम सोळसे यांचा समावेश होता. त्याचबरोबर समाजातील विविध ग्रामपंचायतींवर सरपंच पदावर कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कारही करण्यात आला.