Mon, May 20, 2019 18:29होमपेज › Aurangabad › नातेवाईकाकडून विवाहितेवर बलात्कार

नातेवाईकाकडून विवाहितेवर बलात्कार

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 1:10AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

कामाच्या शोधात पतीसह आलेल्या एका 20 वर्षीय विवाहितेवर मावस सासर्‍याने बलात्कार करण्याची घटना येथे घडली. याप्रकरणी विवाहितीने दिलेल्या जवाबावरून रविवारी (दि. 22) एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पीडित 20 वर्षीय महिलेचे दोन वर्षांपूर्वी लग्‍न झाले होते. पतीचे डी. एड. पर्यंत शिक्षण झाले आहे. दरम्यान सदरील महिला तीन महिन्यांची गर्भवती असताना 17 मार्च रोजी पतीसह ती कामाच्या शोधात वाळूज महानगरात आली होती. 

काम मिळेपर्यंत हे दोघे मावस सासरा चंद्रकांत फकिरा अंभोरे याच्या घरी थांबले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी घरातील मंडळी झोपलेली असताना आरोपी चंद्रकांत याने महिलेस चहाचा बहाणा करून तिचा विनयभंग केला. 22 मार्च रोजी घरातील सर्व जण कामावर गेले असता तिच्या एकटेपणाचा फायदा घेत बलात्कार केला. महिलेचा पती कामावरून घरी आला असता तिने  घडलेला प्रकार त्यास सांगितला. मावशी व काकाला शिवीगाळ करत हे दाम्पत्य तेथून आपल्या गावाकडे निघून गेले. सासरी काही दिवस राहिल्यानंतर महिलेला उलट्यांचा त्रास होऊन तिचा गर्भपात झाला.

त्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू असताना वाळूज महानगरात आपल्यावर अत्याचार झाल्याचे महिलेने सासूला सांगितले. यावेळी तिला धीर देण्याऐवजी सासू तसेच नणंद यांनी उलट तिलाच मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर सदरील महिला माहेरी निघून गेली. तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर रविवारी पीडितेने आईसोबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि. आरती जाधव या करीत आहेत.

Tags : Aurngabad, Married, raped, relative