Wed, Jul 17, 2019 12:06होमपेज › Aurangabad › शहरात महावीर जयंती महोत्सव उत्साहात

शहरात महावीर जयंती महोत्सव उत्साहात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

सकल जैन समाज अंतर्गत 2617 वा श्री भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव उत्साहात साजरा झाला. संपूर्ण शहर महावीर भगवान की जय या गजराने दणाणून निघाले. सकाळी 8 वाजेच्या सुमारास पैठणगेट येथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली. साधुसंतांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत शहरातील सर्व भागातील नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी भारतात असलेली जैन समाजाची एकजूट अशीच टिकवून ठेवा असे सांगत ‘जिओ और जिने दो’चा संदेश दिला. 

राजाबाजार जैन मंदिर येथून सकाळी 6 वाजता वाहन रॅली काढण्यात आली. त्यानंतर भगवान महावीर उड्डाणपूल जैन स्तंभ येथे सकाळी 7 वाजता धर्म ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष आमदार अतुल सावे, आमदार सुभाष झांबड, नंदकुमार घोडेले, किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल, नामदेव पवार, विकास जैन, अंबादास दानवे, महावीर पाटणी, जी. एम. बोथरा, जन्मकल्याणक समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया, अनिल संचेती, रमेश घोडके, राजेश मुथा, मुकेश साहुजी, मिठालाल कांकरिया, भारती बागरेचा, करुणा साहुजी, भावना सेठिया, नीलेश पहाडे, मंगला गोसावी, मंगला पारख, कविता अजमेरा, कल्पेश गांधी, प्रवीण भंडारी, कल्पेश गांधी, विकास रायमाने, पीयूष कासलीवाल, संतोष पापडीवाल, संजय सुराणा, अंकुर साहुजी, रवी लोढा, मीना पापडीवाल, वासंती काळे आदींची उपस्थिती होती. 7.15 वाजता जैन छात्रालय उस्मानपुरा येथे ध्वजारोहण, गुरू गणेशनगर येथे 7.30 ध्वजारोहण करण्यात आले. कचरा आणि प्लास्टिक मुक्‍तीचा संदेश देण्याच्या उद्देशाने रथयात्रेचे नियोजन करण्यात आले होते.

चॉकलेट, सुका मेवा, आवळा, खजूर, आमवडी, चिक्‍की, द्राक्षे, ऑरेंज गोळी, मिनी पेढा, पेठा, मोतीचूर, शेंगदाणा लाडू, खडीसाखर आणि फळवाटप करण्यात आले. रथयात्रेचा समारोप झाल्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणात महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. यावर्षी स्वर्गीय डॉ. चंपालालजी देसरडा यांच्या स्मृतीत प्रभादेवी देसरडा शेखर चंपालाल देसरडा आणि देसरडा कुटुंबीय महाप्रसादाचे लाभार्थी होते.  सकाळी 10 ते 2 दरम्यान रक्‍तदान शिबीर, थॅलेसेमिया तपासणी शिबीर आणि रोपट्यांचे वाटप करण्यात आले. 

महाप्रसादाच्या मंडपासाठी ख. दि. जैन पंचायत पार्श्‍वनाथ मंदिर राजाबाजार व जयेश ओस्तवाल यांच्या स्मरणार्थ शांतीलाल, नितीन, दिलीप, महावीर ओस्तवाल परिवार, भोजन प्रांगणासाठी रेल्वेस्टेशन जैन श्री संघ, जलपान व्यवस्थेसाठी विजय, जितेंद्र, नितीन, पाटणी परिवार विजय टायर्स, तसेच छाछसाठी स्व. दलिचंद सुराणा यांच्या स्मरणार्थ पदमराज जतनराजजी सुरेश, किशोर, सुराणा परिवार, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पारितोषिकासाठी सिग्मा गु्रप ऑफ हॉस्पिटलचे डॉ. उन्मेष टाकळकर, झाकियाँ व वाहन व्यवस्थेसाठी संयुक्‍त सैतवाल समाज कलिकुंड पार्श्‍वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर हडको, तसेच झाकियाँ पारितोषिकासाठी जैन श्‍वेतांबर तेरापंथ सभा यांनी परिश्रम घेतले.

सामाजिक संदेश देणार्‍या 108 कारची मिरवणूक

ज्युनिअर सिडको रॉयल जैन ग्रुपतर्फे यावर्षी कचरा व्यवस्थापन, क्लीन सिटी-ग्रीन सिटी, साक्षरता, वाहतूक व्यवस्थापन, वीज वाचवा, पाणी वाचवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, जैन धर्माची शिकवण, जैन साधूसंतांची शिकवण आणि भगवान महावीर यांचे विचार यांची शिकवण संदर्भात घोषवाक्ये तयार करण्यात आली होती.  या रॅलीला सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष आमदार सुभाष झांबड यांच्या हस्ते पंचरंगी झेंडा दाखवून सकाळी सहा वाजता सुरूवात करण्यात आली. 108 कारच्या माध्यमातून हे सामाजिक, धार्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोचविले. ही मिरवणूक सिडको एन-3 येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरापासून काढण्यात आली. ही रॅली हायकोर्ट चौक, आकाशवाणी, मोंढा नाका, शासकीय दूध डेअरी, क्रांती चौकमार्गे जाऊन समारोप भगवान महावीर स्तंभ येथे समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे या रॅलीचे नियोजन ग्रुपमधील मुलांनी पॉकेट मनीतून केले होते. यात गौरव मुगदिया, प्रतीक बाफना, शुभम जैन, शुभम मोगले, यश मुथा, पार्शना सांड, समीक्षा झांबड, अपेक्षा जैन, आरती जैन या तरुणांचा सहभाग होता.

महावीर रसोई घर गाडीचे लोकार्पण 

भगवान महावीर जयंतीनिमित्त सकल जैन समिती अंतर्गत महावीर रसोई घर गाडीचे लोकार्पण करण्यात आले.  ही रसोई घर गाडी 365 दिवस घाटी रुग्णालयात रुग्ण आणि गरजूंसाठी अन्नदान करणार आहे. यामध्ये गरजूंसाठी जेवण मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

 

Tags : Aurangabad, Aurangabad news, Mahavir Jayanti Festival,


  •