Sat, Jul 20, 2019 23:24होमपेज › Aurangabad › एमपीएससी टॉपर औरंगाबादचा

एमपीएससी टॉपर औरंगाबादचा

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:09AMऔरंगाबाद : गजेंद्र बिराजदार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यातून पहिला आलेला रोहितकुमार राजेंद्रसिंह डाडरवाल-राजपूत हा मूळचा औरंगाबादचा असून नूतन कॉलनी येथे त्याचे घर आहे. रोहितचे आजोबा विठ्ठलसिंह राजपूत हे त्या काळात शहरातील प्रसिद्ध वकील होते. रोहितच्या यशाचे वृत्त समजल्यानंतर त्याच्या येथील नातेवाइकांनी ही माहिती दिली. 

रोहितच्या आजोबांनी 50 वर्षांपूर्वी नूतन कॉलनी येथे श्रमसाफल्य नावाचा बंगला बांधला. त्याचे अन्य कुटुंबीय आजही येथेच राहतात. रोहितच्या वडिलांना फोटोग्राफीचा छंद होता. छंदाचेच व्यवसायात रूपांतर करून ते यावल (जि. जळगाव) येथे स्थायिक झाले. त्यामुळे रोहितचे शालेय शिक्षण तिकडेच झाले. मात्र, या शहराशी असलेली नाळ त्याने जपली     ाहे. दैनिक पुढारीशी बोलताना त्याने शहरातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, माझे लहानपण यावल येथे गेले असले तरी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीतील नूतन कॉलनीतील आमची धमाल ठरलेली. आम्ही येथेच सुट्या व्यतित करायचो.

रोहितचा प्रवास...
रोहितचे शालेय शिक्षण भुसावळ येथे झाले. दहावीला त्याला 89 टक्के गुण मिळाले. त्याने पुण्यात 11 वीला प्रवेश घेतला. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकीत प्रवेश मिळाला. मात्र, त्यात त्याचे मन रमले नाही. शेवटच्या वर्षाला असताना त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयातील कक्ष अधिकारी हे पद प्राप्त केले. नोकरीवर रुजू झाल्यानंतर दोन वर्षे अभ्यास करून तो आता उपजिल्हाधिकारी झाला आहे.