होमपेज › Aurangabad › आमदार कन्येचे लग्‍न सामुदायिक सोहळ्यात 

आमदार कन्येचे लग्‍न सामुदायिक सोहळ्यात 

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 23 2018 1:15AMपळशी : प्रतिनिधी

आ. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या कन्येचा विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात पार पाडून सर्व समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. एरव्ही पुढारी फक्‍त सल्ले देतात. पण आ. सत्तार यांनी कृतीतून नवीन पायंडा पाडून दिला असून असे विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

सिल्लोड येथे रविवारी नॅशनल एज्युकेशन सोसाईटीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या विवाह सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास पाटील चिकटगावकर, प्रभाकर पालोदकर, जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.मौलाना गुलाम मोहमद वस्तान्वी यांनी 555 जोडप्यांचा हजारो जनमुदायाच्या साक्षीने निकाह लावला. विवाहबद्ध जोडप्यांना एज्युकेशन सोसाईटीच्या वतीने संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले. 

Tags : Aurangabad, MLA, daughters, common, wedding