Fri, Apr 26, 2019 15:39होमपेज › Aurangabad › एमकेसीएलची सूत्रे  सामान्य प्रशासनकडे

एमकेसीएलची सूत्रे  सामान्य प्रशासनकडे

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 12:44AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत स्थापन झालेल्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीचे नियंत्रण आता सामान्य प्रशासन विभागाकडे असणार आहे़  

कंपनी कायदा 1956 अन्वये महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या कंपनीची स्थापना 2001 मध्ये झाली़  शासनाने या कंपनीस मान्यता देऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत चालणार्‍या विविध कामांचे कंत्राट कंपनीकडे दिले होते़  यात प्रामुख्याने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह 10 विद्यापीठांच्या कामांचा समावेश होता.

ही कंपनी आतापर्यंत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित होती. तथापि, आता तिचे सामान्य प्रशासन विभागाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.