Fri, Mar 22, 2019 07:55होमपेज › Aurangabad › अटलजींच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला विरोध; एमआयएम नगरसेवकाला चोप

अटलजींच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला विरोध; एमआयएम नगरसेवकाला चोप

Published On: Aug 17 2018 1:52PM | Last Updated: Aug 17 2018 5:31PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेत आज भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यास भाजप नगरसेवकांनी सभागृहातच चोप दिला. 

काल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. अटलजींना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव महापालिकेत सेनचे राजू वैद्य यांनी मांडला. याला एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. ते ऐकताच संतप्त नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे त्यांच्यावर धावून गेले. सर्व नगरसेवकानी मतीन यांना जोरदार मारहाण करत सभागृहाबाहेर पिटाळून लावले. त्यानंतर सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली.

यानंतर महापालिकेत एमआयएम कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. औरंगाबादमधील टाऊन हॉल भागातही दुकांनवर दगडफेक करण्यात आली असून यात भाजप संगठनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला. चालक विकास बोराडेला मारहाण करण्यात आली आहे.

माजी पंतप्रधान भारतरत्न वाजपेयी यांच्यांबद्दल आमच्या  पक्षाला, आम्हाला नितांत आदर आहे, सभागृहातील प्रकार दुर्दैवी असून ती सय्यद मतीन यांची स्टंटबाजी आहे. त्याच्याशी पक्षाचा संबंध नाही. -गटनेता नासेर सिद्दिकी

भाजपाचे आमदार अतुल सावे यांची प्रतिक्रिया

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया