Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : एमबीएचा पेपर सहाव्या मिनिटालाच फुटला

औरंगाबाद : एमबीएचा पेपर सहाव्या मिनिटालाच फुटला

Published On: Jan 01 2018 1:10PM | Last Updated: Jan 01 2018 1:21PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी (ता. १) एमबीएचा 'अकौटिंग फॉर मॅनेजर' हा पेपर फुटला. विशेष म्हणजे, वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील शिपायांनी पेपर फोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडले आहे. देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम हा परीक्षा केंद्रावर होता. दहा ते एक दरम्यान पेपर सुरु होता. अवघ्या सहा मिनिटात पेपर बाहेर गेला.

'फ्युचर मॅनेजर' या ग्रुपवर पेपरचा स्नॅप आला होता. दोघेजण झाडाखाली बसून उत्तर लिहित असताना त्यांना शिपायांनी बाहेर पकडले. १० वाजून १२ मिनिटांनी शिपाई सतीश पवार, हनुमंत कोरडे, रवी गवळी यांनी विद्यार्थ्यांना पकडले. त्यांना पकडून आत बसलेल्या विद्यार्थ्यांला ट्रेस केले. पाठवणाऱ्याचा डीपी ट्रेस केला तर, तो हॉल नंबर सहामध्ये सापडला. त्यानंतर तत्काळ त्याचे हॉल तिकीट फाडून टाकले. पकडलेल्या तिघांना प्राचार्यांच्या दालनात ठेवण्यात आले आहे.

परीक्षा व मुल्यमापन नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, उपकुलसचिव डॉ. प्रताप कुलावंत, प्राचार्य मजहर फारुखी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. २६ डिसेंबर पासून परीक्षा सुरु आहेत.

आज पेपर रद्द केला आहे. सहा केंद्रावर पेपर सुरु आहेत. पोलिस तक्रार करण्यात येईल. विद्यापीठाचीही समिती नेमण्यात येईल.
- दिगंबर नेटके, संचालक,
परीक्षा व मुल्यमापन नियंत्रण मंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.