Tue, Mar 26, 2019 12:23होमपेज › Aurangabad › लुमॅक्सच्या कामगारांचे आंदोलन

लुमॅक्सच्या कामगारांचे आंदोलन

Published On: Feb 10 2018 1:27AM | Last Updated: Feb 10 2018 12:44AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर ए-8 मधील लुमॅक्स ऑटो कंपनी व्यवस्थापनाने कंपनीला वर्षभरापूर्वी टाळे ठोकल्यामुळे बेरोजगार झालेल्या कामगारांनी शुक्रवारी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह जोरदार निदर्शने केली. 

या अंदोलनाकडे कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने काही संतप्त महिलांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर चढून कंपनीत शिरण्याचा प्रयत्न केला. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर ए-8 येथे लुमॅक्स ऑटो कंपनीत दुचाकी स्पेअर-पार्टचे उत्पादन घेण्यात येत असे, मात्र कंपनी व्यवस्थापकाने 30 डिसेंबर रोजी कामगारांना अंधारात ठेवून कंपनी तोट्यात जात असल्याचे कारण पुढे करून कंपनीला टाळे ठोकले होते. यामुळे या कंपनीत गेल्या 15-20 वर्षांपासून काम करणार्‍या कामगारांवर जवळपास 13 महिन्यांपासून बेकारीची कुर्‍हाड पडली आहे. तर वाळूज परिसरातील के-76 व साजापूर गट न. 53 मध्ये असलेल्या लुमॅक्स कंपनीच्या दोन प्लॅँटमध्ये कंपनी व्यवस्थापनाकडून मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार भरती करून भरघोस उत्पादन घेतले जात असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. 
यावेळी शंकर नन्नुरे, विष्णू आंबाळकर, बी.एम. ढाकणे, ताराचंद खोसे, केशव काळे, इकबाल शहा, जी.के. औटी, शहाजी जगताप, एम.एस. गोरे, के.व्ही काळे आदींसह कामगार व कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, याठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी फौजदार अमोल देशमुख, लक्ष्मण उंबरे तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.