Tue, Jul 23, 2019 04:08होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत पुन्हा यकृत प्रत्यारोपण

औरंगाबादेत पुन्हा यकृत प्रत्यारोपण

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 18 2018 1:55AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

एमजीएम रुग्णालयात मुंबईतील 69 वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. करण्यात आले. तीन महिन्यांच्या कालावधीतील मराठवाड्यातील हे दुसरे यकृत प्रत्यारोपण असून नागपूरच्या बे्रनडेड रुग्णाचे यकृत चार्टर विमानाने औरंगाबादेत आणण्यात आले. विमानतळापासून एमजीएम रुग्णालयापर्यंत पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. सायंकाळी 6 वाजता यकृत एमजीएम रुग्णालयात पोहचल्यानंतर शस्त्रक्रियेला सुरुवात झाली.

नागपूर येथील 52 वर्षीय रुग्णाला गुरुवारी (15) मेंदूत रक्तस्राव झाल्याने तेथील वोक्खार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी डॉक्टरांनी बे्रनडेड घोषित केले. नातेवाइकांची परवानगी मिळाल्यानंतर झेडटीसीसीने सूत्रे हलविली. यादीनुसार रुग्णाचे हृदय चेन्नईला, किडनी नागपूर, व यकृत औरंगाबादला पाठविण्यात आले. मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांची टीम यकृत आणण्यासाठी नागपूरला गेली होती. झेडटीसीसीच्या यादीत प्रथम असलेल्या 69 वर्षीय रुग्णासोबत मुंबईला संपर्क  करण्यात आला. त्यांनी तत्काळ होकार कळविल्यानंतर त्यांना औरंगाबादेत हलवून चाचण्या करण्यात आल्या.

शनिवारी (दि.17) दुपारी 2 वाजता नागपूरच्या डॉक्टरांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर औरंगाबादेत एमजीएम रुग्णालयात डॉ. प्रवीण सूर्यवंशी व त्यांच्या टीमने रुग्णावर यकृत काढण्यासाठी शस्त्रक्रिया सुरू केली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णाचे यकृत यशस्वीरीत्या काढण्यात आले. यानंतर नागपूरहून आणलेले यकृत प्रत्यारोपणाला  सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती. डॉ. प्रवीण सूर्यवंशी, रवी मोहंका, डॉ. प्रशांत राव, डॉ. नारायण सानप, डॉ. नागेश जंबुरे, डॉ. अमोल यांनी ही शस्त्रक्रिया केली. 24 नोव्हेंबर 2017 रोजी बे्रनडेड झालेल्या दिनेश असावा यांचे यकृत सुरतच्या रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले होते.