Fri, Mar 22, 2019 22:59होमपेज › Aurangabad › लेखक वेदनेची कहाणी सांगत असतो

लेखक वेदनेची कहाणी सांगत असतो

Published On: Feb 12 2018 1:48AM | Last Updated: Feb 12 2018 12:58AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सामान्य व्यक्तीच्या जीवनाचा आढावा लेखणीतून सातत्याने लेखक मांडत असतो. त्याच्या मांडण्यामध्ये सर्वोच्च स्थानी वेदनेची भाषा असते. अर्थात वेदनेची कहाणी तो सांगत असतो, असे प्रतिपादन नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. मसापतर्फे देशमुख यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर न्या. नरेन्द्र चपळगावकर, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, डॉ. गणेश मोहिते व डॉ. रामचंद्र काळुंखे यांची उपस्थिती होती. 

देशमुख म्हणाले की, एक कार्यकर्ता म्हणून लेखन करीत आलो आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मराठवाड्यातील मातीतला हा सत्कार मला आपल्या माणसांची शाबासकी आहे. मानवी जीवनात कला साहित्याचे स्थान वेगळे आहे. सातत्याने लेखक हा दुःखाची वेदनेची कहाणी तो लिखाणातून मांडत असतो. तसेच आधुनिक समाज निर्माण होण्यासाठी समता, बंधुता ही मूल्य रुजविण्यासाठी लिखाणातून समाजप्रबोधन करणे गरजेचे वाटते. त्यानंतर न्या. चपळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. मसाप अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन दादा बोरसे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, श्रीकांत उमरीकर, रा.रं.बोराडे आंदीची उपस्थिती होती.