Sun, May 26, 2019 09:46होमपेज › Aurangabad › पतंगाच्या मांज्यामुळे तरुणाचे कापले नाक 

पतंगाच्या मांज्यामुळे तरुणाचे कापले नाक 

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 14 2018 12:24AM

बुकमार्क करा
 वैजापूर : प्रतिनिधी 

पतंगाच्या मांज्यामुळे पायी जाणार्‍या एका तरुणाचे नाक कापल्याची घटना शनिवारी सकाळी गंगापूर रस्त्यावर घडली. देवाशीष रवी पारखे असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, नायलॉन मांज्याचा छुपा वापर होत असल्याने शहरात अशा दुर्घटना होत असल्याचे नागरिक बोलत असून नायलॉन मांजाची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. देवाशीष हा शनिवारी सकाळी गंगापूर रस्त्याने पायी जात होता

. त्यावेळी पतंगाचा मांजा नाकावरून गेल्याने त्याचे नाक कापले गेले. त्याला जखमी अवस्थेत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  नाकावर छोटी शस्त्रक्रिया केली असून त्याला चार ते पाच टाके पडले आहेत. दरम्यान, दुर्घटना टाळण्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांज्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.