Mon, Apr 22, 2019 16:22होमपेज › Aurangabad › पत्रकारास मारहाण, ६ आरोपी अटकेत 

पत्रकारास मारहाण, ६ आरोपी अटकेत 

Published On: Apr 06 2018 2:19AM | Last Updated: Apr 06 2018 1:41AMवाळूज : प्रतिनिधी 

पाणीटंचाईची बातमी छापल्याचा राग मनात धरून शेंदुरवादा भागातील 6 गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी स्थानिक दैनिकाच्या एका पत्रकारास  बेदम मारहाण केली, पोलिसांनी या घटनेतील सर्व 6 आरोपींंना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल म्हस्के असे हल्‍ला झालेल्या पत्रकाराचे नाव असून त्यांच्यावर प्राणघातक हल्‍ला केल्याने कानाचा पडदा फाटला आहे.

वाळूज पोलिसांनी दिलेली माहितीनुसार  दुपारी 1 वाजेच्या दरम्यान नंदू चिडे याने फोन करत म्हस्के यांना बोलावून घेतले. त्यावेळी त्याचे दोन भाऊ व अन्य आसाराम बनकर, पोपट बनकर, बद्री चिडे व राजू चिडे हेही उपस्थित होते.

त्यावरून पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ा घटनेचा गंगापूर तालुका पत्रकार संघ व वाळूज महानगर पत्रकार संघाने निषेध करत पो.न.सतीश टाक यांची भेट घेत आरोपींवर कारवाईची मागणी लावून धरली. पो.नि. टाक यांनी 307 नुसार कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने पत्रकारांचे शिष्टमंडळ ठाण्यातून बाहेर पडले.
स चिडे याने बातमी प्रकाशित झालेले  वर्तमानपत्र म्हस्के यांच्या तोंडावर फेकत अर्वाच्च शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. म्हस्के यांनी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतल्यावर इतर 6 जणांनी पाठलाग करत म्हस्के यांना पुन्हा बेदम मारहाण केली. यात त्यांच्या डाव्या कानाचा पडदा फाटला. 

घटनेच्यावेळी  महेश चिडे याने म्हस्के यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. म्हस्के यांनी वाळूज पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.पोलिसांनी याची तत्काळ दखल घेतली.