Wed, Apr 24, 2019 20:06होमपेज › Aurangabad › जेट एअरवेज दिल्ली सेवेसाठी सज्ज

जेट एअरवेज दिल्ली सेवेसाठी सज्ज

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 16 2018 11:30PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विविध कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना सोमवारी मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून यात जेट एअरवेजने औरंगाबादेतून दिल्ली सेवा सुरू करण्यास तयार असल्याचे सांगितले. जेट एअरवेजकडून तयारी पूर्ण झाली असून विमानतळ प्राधिकरणच्या हायर अथॉरिटीकडून परवानगी मिळताच दिल्ली सेवा सुरू करणार असल्याची माहिती जेट एअरवेजचे व्यवस्थापक जलील अहमद यांनी दिली.

सोमवारी(दि.16) विभागीय आयुक्‍त कार्यालयात झालेल्या बैठकीत औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत झूम, एअर एशिया, एअर इंडिया, जेट एअरवेज, स्पाईस, इंडिगा, आदी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी अनेक विमान कंपन्या औरंगाबादेतून विविध भागात सेवा देण्यासाठी तयार आहेत, परंतु त्यांची आणखी पूर्ण तयारी झाली नाही. तसेच याच बैठकीत जेट एअरवेजचे प्रतिनिधी जलील अहेमद यांनी औरंगाबाद ते दिल्ली सेवा देण्यासाठी आमची कंपनी तयार असल्याची माहिती दिली. म्हणजे लवकरच जेटची दिल्ली सेवा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या जेट एअरवेजची औरंगाबाद मुंबई विमान सेवा सुरू आहे. ही सेवा उत्कृष्ट असल्याने अनेक प्रवासी याकडे आकर्षित झाले आहेत. सध्या औरंगाबादेतून केवळ एअर इंडियाची दिल्ली विमानसेवा सुरू आहे, परंतु ती दुपारी असल्याने सकाळच्या सत्रात दिल्लीला जाण्यासाठी येथून कुठलीच विमानसेवा नाही. नेमके हेच हेरून जेट एअरवेजने दिल्ली विमानसेवा सकाळी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. झूम एअरवेजही अनेक दिवसांपासून औरंगाबादेतून दिल्ली विमानसेवा देण्यास तयार आहे. यावर लवकरच शिक्‍कामोर्तब करण्यात येईल अशी शक्यता व्यक्‍त करण्यात येत आहे. याचबरोबर इतर सहा कंपन्यांनी मुंबई, दिल्लीसह इतर ठिकाणी विमानसेवा देण्यासाठी उत्सुक आहेत. 

कंपनीची पूर्ण तयारी : जेट एअरवेजने औरंगाबादेतून सकाळी दिल्ली सेवा सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. कंपनीची दिल्ली सेवा देण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. आता केवळ हायर अथॉरिटीच्या परवानगीची गरज आहे. परवानगी मिळताच येथून दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. 

प्रवास भाड्यात सवलत द्या

या बैठकीत विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन दिलेले अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी विमानतळ विस्तारीकरण कृती समितीचे प्रमुख बाबासाहेब दहिहंडे यांनी विमानाच्या विस्तारीकरणासाठी जमिनी दिल्या, परंतु आजपर्यंत शेतकर्‍यांना कुठल्याच सवलती दिल्या नाहीत, त्यामुळे येथील शेतकर्‍यांना प्रवास भाड्यांत सवलत द्यावी, तसेच आमच्या पाल्यांना नोकरी किंवा विमानतळावर व्यवसाय करण्याची संधी द्यावी अशी मागणी दहिहंडे यांनी केली.