होमपेज › Aurangabad › आभासी चलनाच्या मोहात कोट्यवधींची गुंतवणूक

आभासी चलनाच्या मोहात कोट्यवधींची गुंतवणूक

Published On: Feb 05 2018 2:02AM | Last Updated: Feb 05 2018 2:02AMबीड : प्रतिनिधी

जगभरात आभासी चलन असलेल्या बिटक्‍वाईनची वेगाने किंमत वाढत चालली असून या मोहात जिल्ह्यातील व्यावसायिक, सर्वसामान्य, तरुण अडकू लागली आहेत. त्याचा फ ायदा घेत बिटक्‍वाईन सारचे असंख्य क्‍वाईन्स बाजारात आले आहेत. विशेष म्हणजे अगदी 500 रुपयांपासून गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले जात असल्याचे समोेर आले आहे. 
बिटक्‍वाईनमध्ये बीड जिल्ह्यातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी तरुणांनी यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. बीट क्‍वाईन व त्या सारखेच आभासी असणारे लिटक्‍वाईन, इथिरिअम, झेड कॅश, डार्क क्‍वाईन, डार्क क्‍वाईन ऊर्फ  डॅश, रिप्पल ऊर्फ  आणि मोनेरो अशा प्रमुख सात क्‍वाईन्समध्ये देखील जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक पैसे गुंतवत आहेत. 

मायनिंगकडेही तरुणांचा ओढा

बिटक्‍वाईनमध्ये रोखीने गुंतवणूक करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे तरुण मंडळी बिटक्‍वाईन मायनिंगकडे वळत आहे. मायनिंग म्हणजे कॉप्युटरद्वारे बिटक्‍वाईन्सची निर्मिती केली जाते. त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यासाठीचे सॉफटवेअर काही कंपन्या देत आहेत. त्यासाठी काही रक्‍कम जमा करून घेतली जाते. दिवसभर कॉप्युटर सुरू ठेवून मायनिंग केली जाते 

सर्व प्रक्रिया होते ऑनलाइन

बीड सारख्या भागात आभासी चलनामध्ये गुंतवणुकीसाठी लहान सेमिनार आयोजित होत असले तरी त्यासाठीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. सेमिनारमध्ये येणार्‍या लोकांना क्‍वाईन्सचा आजचा भाव, पूर्वीचा भाव, भविष्यात होणारी वाढ यासह वेगवेगळ्या प्रकारेचे व्हिडिओेज मोबाइलवर पहाण्यासाठी दिले जातात. त्यांचा पाठपुरावा केेला जात असल्याने अनेकजण या मोहात अडकू लागले आहेत.