Mon, Apr 22, 2019 06:04होमपेज › Aurangabad › आज सुरू होणार इंटरनेट

आज सुरू होणार इंटरनेट

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियात पसरणार्‍या अफवांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शनिवारी 48 तासांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यानुसार, सोमवारी इंटरनेट सुरू होण्याची शक्यता होती, मात्र आणखी 24 तासांसाठी ही सेवा बंद केल्यामुळे आता मंगळवारी (दि. 15) सकाळी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. 

जुन्या औरंगाबादमध्ये शुक्रवारी (दि. 11) रात्री अचानक दंगल पेटली. गांधीनगर, मोतीकारंजा, राजाबाजार, शहागंज, नवाबपुरा चौक, जिन्सी भागात तुफान दगडफेक करून अनेक दुकाने जाळण्यात आली. यात कोट्यवधीचे नुकसान झाले. दरम्यान, या दंगलीनंतर शहरात अफवांचे पेव फुटले होते. सोशल मीडियावर विविध व्हिडिओ, मेसेज पाठवून दंगल भडकावण्याचे कारस्थान रचण्यात येत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे विविध मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा शनिवारी (दि. 12) दुपारपासून 48 तासांसाठी बंद करण्यात आली होती. आता पुन्हा सोमवारी (दि.14) सकाळी 7 वाजेपासून पुढील 24 तासांसाठी ही सेवा बंद करण्यात आली. मंगळवारी सकाळी इंटरनेट  सुरू होण्याची शक्यता आहे. सलग दुसर्‍या दिवशी इंटरनेटसह मोबाइलची एसएमएस सेवाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे ब्रॉडबँड आणि कॉम्प्युटरच्या साहाय्याने ऑनलाइन व्यवहार करणार्‍यांना ओटीपी (वन टाईम पासवर्ड) देखील मिळत नव्हता. ओटीपी अभावी ऑनलाइन व्यवहार, मोबाइल बँकिंग, मनी ट्रान्सफर करणे अशक्य झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.