होमपेज › Aurangabad › औरगाबाद : चोरांबाबतच्या अफवा रोखण्यासाठी इंटरनेट बंद

औरगाबाद : चोरांबाबतच्या अफवा रोखण्यासाठी इंटरनेट बंद

Published On: Jun 15 2018 6:20PM | Last Updated: Jun 15 2018 6:20PMऔरगाबाद : पुढारी ऑनलाइईन

गावात चोर शिरल्याच्या अफवांनी औरंगाबादमधील गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. चोर असल्याच्या संशयावरुन काहींना मारहाण झाल्याचीही घटना घडली आहे. या अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चोर असल्याच्या संशयावरुन आज पेडगावमध्ये दोघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अशा घटनांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आजपासून सात दिवसांसाठी संध्याकाळी सात ते पहाटे २ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. वैजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय दिला आहे.