होमपेज › Aurangabad › कर भरा, समस्या सुटतील

कर भरा, समस्या सुटतील

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:46AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

हिंदू संस्कृतीत अन्‍नदान, भूदान, जलदान यासारखे दुसरे पुण्य नाही, असे सांगितले आहे. गावाला एमआयडीसीकडून शुद्ध पाणी मिळाले आहे. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीकडे वेळवेर कराचा भरणा करावा. यामुळे गावातील मूलभूत समस्या सोडविताना ग्रामपंचातीला अडचणी येणार नाहीत, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्‍त केले. 

आसेगाव येथे शनिवारी एमआयडीसीच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा उद्योगमंत्री यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, सरपंच बिजला शेळके, महापौर नंदकुमार घोडिले, युवा सेना जिल्हाध्यक्ष संतोष माने, दिनेश मुथा, आशिष पेंडकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी सरपंच संजय शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश हिवाळे यांनी केले. यावेळी उपसरपंच परवेज पठाण, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब मतसागर, ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ रावते, काशीनाथ पल्हाळ, गोविंद जाधव, नारायण कांबळे, हिराबाई जाधव आदींची उपस्थिती होती. 

आसेगावातील नागरिकांना गेल्या पंधरा-वीस वषार्र्ंपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी गावात टँकर सुरू करावा लागत असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसे. परिणामी नागरिकांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. शिवाय परिसरात असलेल्या केमिकल कंपन्यांमुळे या भागातील जलसाठे दूषित झाल्याने नागरिकांना जारचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत होती. 

Tags : Aurangabad, Industry Minister Subhash Desai opinion