Sat, Aug 17, 2019 16:14होमपेज › Aurangabad › ऑनलाइनकडे वीज ग्राहकांचा वाढता कल 

ऑनलाइनकडे वीज ग्राहकांचा वाढता कल 

Published On: Apr 25 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 11:48PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महावितरणने वीजबिल भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांना तासन् तास रांगेत उभे राहण्याची वेळ येत नाही. या सुविधेचा लाभ घेणार्‍या ग्राहकांची संख्या वाढली असून औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणार्‍या 11 जिल्ह्यांतील 4 लाख 56 हजार 190 ग्राहकांंनी 71.93 कोटी रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे. 

महावितरणने लघुदाब वीज ग्राहकांसाठी ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच ग्राहकांसाठी मोबाइल अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डसह मोबाइल वॅलेट आणि कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. महावितरणने याबाबत जनजागृती केल्याने याला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत थांबण्यापेक्षा घरबसल्या इंटरनेट, मोबाइलवर वीजबिल भरण्याच्या सुविधेचा लाभ घेणार्‍यांची संख्या वाढत आहे. ऑनलाइन वीजबिल भरण्याच्या सुविधेचा जास्तीत जास्त  वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे. 

Tags : Aurangabad, Increasing, trend,  electricity, consumers, online