Wed, Jul 24, 2019 12:42होमपेज › Aurangabad › शिवजन्मोत्सव झेंडा वाटप केंद्र, जागृती रथाचे उद्घाटन

शिवजन्मोत्सव झेंडा वाटप केंद्र, जागृती रथाचे उद्घाटन

Published On: Feb 12 2018 1:48AM | Last Updated: Feb 12 2018 1:07AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सकल मराठा समाज आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव-2018 निमित्त जालना रोडवली गोदावरील पाटबंधारे महामंडळाच्या समोरील इमारतीत मराठा क्रांती मोर्चा संपर्क कार्यालयात झेंडा वाटप केंद्र आणि जनजागृतीसाठी बनवण्यात आलेल्या रथाचेही उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी समाजबांधवांची उपस्थिती होती. शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी शहर भगवेमय करण्यास मराठा क्रांती मोर्चातर्फे शिवभक्‍तांना सवलतीच्या दरात ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर भगवा ध्वज व इतर साहित्य उपलब्ध करण्यात येणार आहेत.