Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Aurangabad › ...अन्यथा गांधीजी फक्‍त नोटांवर : प्रा. जयदेव डोळे

...अन्यथा गांधीजी फक्‍त नोटांवर : प्रा. जयदेव डोळे

Published On: Jul 06 2018 1:30AM | Last Updated: Jul 06 2018 1:25AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

असत्य व हिंसेच्या आधारावरच वर्तमान परिस्थितीत राज्यकर्त्यांचा कारभार चालू आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी गांधीजींच्या सत्य, अहिंसेचा विचार लोकमनामध्ये जागृत करणे गरजेचे आहे. देशावर येणार्‍या प्रत्येक समस्येला गांधी प्रयोगाने सोडविता येते, परंतु ती द‍ृष्टी ठेवणार्‍या राज्यकर्त्यांची गरज आहे, अन्यथा  गांधी फक्‍त नोटांवर व पंतप्रधानांच्या ओठावरच असतील, त्यामुळे गांधी विचारांचे जागरण करणे काळाची गरज आहे, असा एकत्रित सूर निघाला ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि वर्तमान’ या विषयावर आधारित परिसंवादातात. 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, औरंगाबाद शाखेच्या वतीने, गुरुवारी (दि. 5) समर्थनगरातील गांधी भवनाच्या नूतनीकरण वास्तूच्या उद्घाटनानंतर परिसंवाद झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गांधी स्मारक सेवा निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन यांची उपस्थिती होती. परिसंवादात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. जयदेव डोळे, न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी परखड मते मांडली.   

प्रा. डोळे म्हणाले की, गांधी हे सत्य, अहिंसेशी एकरूप झालेले व्यक्‍तिमत्त्व होते, परंतु आजच्या राज्यकर्त्यांना त्यांच्या मातृसंस्थेने सत्य, अहिंसेचे शिक्षणच दिलेले नाही. जाणीवपूर्वक असत्य व हिंसेचा प्रचार केला जात आहे. हे वास्तव टाळता येणार नसून देशाचे भविष्य धोक्यात आहे. विशेषतः वर्तमान काळातील माध्यमांमध्येही विश्‍वासार्हता कमी झाली आहे. गांधीजीनी देशाला स्वच्छता, ग्रामीण भारताची 

जाती धर्माचा विचार न करता प्रत्येकाने मानव व आपण भारतीय आहोत या भावनेने जगले पाहिजे असे डॉ. कुमार सप्तर्षी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले. यावेळी डॉ. माधवराव रत्नपारखी, अ‍ॅड. प्रदीप देशमुख, डॉ. मच्छिंद्रनाथ गोर्डे, सुनील पाटील, रेखा जयस्वाल, डॉ. सुभाष सराफ, शिवाजी शिंदे, डॉ. अनघा पाटील, फिरोज खान, विजय कान्हेकर, डॉ. उल्हास उढाण, सागर कान्हेकर आदींची उपस्थिती होती.

चिकित्सा, सत्य व अहिंसेचा मार्ग दिला, परंतु गांधी फक्‍त स्वच्छतेपुरतेच मर्यादित केले आहे. परिणामी, त्यांच्या विचारांचे जागरण करणे काळाची गरज ठरणार आहे. त्यानंतर न्या. चपळगावकर म्हणाले की, कायद्याचा विरोध करा अशी शिकवण गांधीजींनी दिली असा आरोप त्यांच्यावर केला जातो. हा आरोप पूर्णपणे खोटा असून, त्यांनी अन्यायाविरोधात असलेल्या कायद्याचा विरोध, त्यासाठी सत्याग्रह करा, परंतु विरोध करताना त्याच्या शिक्षेलाही सामोरे जा अशी शिकवण त्यांनी दिली आहे. विशेषतः गांधीजींच्या स्वप्नातील राज्यघटना अस्तित्वात आलीच नाही असेही चपळगावकर म्हणाले. कायदा संस्था दुबळ्यांचे संरक्षण करते. त्यामुळे त्याचा अवमान कधीही करू नका अशी शिकवण गांधीजींनी आचरणातून समाजाला दिली आहे.