Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Aurangabad › सातार्‍यात नाल्याचा वाद चिघळला

सातार्‍यात नाल्याचा वाद चिघळला

Published On: Jun 11 2018 12:39AM | Last Updated: Jun 11 2018 12:34AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

पाऊस पडण्यास प्रारंभ झाला की, सातारावासीयांचा जीव धोक्यात येतो. अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसाळ्यातील चार महिने नाले अतिक्रमणाच्या परिणामाला सामोरे जावे लागते. तर मागील आठवड्यात भूमाफियांकडून अधिकार्‍यांना हाताशी धरून एस लोट्स पार्कच्या ओपन स्पेसवर अतिक्रमण केल्याचा प्रकार घडला आहे. याला नागरिकांनी विरोध केला, परंतु भूमाफियांची दंडेलशाहीमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

सातारा परिसरातील मोरल किड्स शाळेजवळ असलेल्या नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहावर भूमाफियांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे मागील वर्षी नागरिकांच्या घरात पाण्याने हाहाकार घातला होता. तरीही मनपा प्रशासनाने नाल्यावरील अतिक्रमण हटविले नाही, परंतु मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावली. 

त्यामुळे वाहत आलेले पाणी पुन्हा नागरिकांच्या घरासमोर थांबले आहे. अखेर मनपाच्या वतीने मोरल किड्स जवळील नाला मोकळा करण्यासाठी कारवाई करण्यात आली, मात्र भूमाफियांच्या दंडेलशाहीपुढे त्यांनी अखेर हात टेकले. कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांनी जवळच असलेल्या  एस लोट्स पार्कच्या ओपन स्पेसवर नाला खोदकामास सुरुवात केली. परिणामी सोसायटीतील नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शविला. 

यावेळी नागरिकांनी नाला खोदकाम करणार्‍या जेसिबीचालकास ओळखपत्र विचारले असता, त्यांच्याकडे ओळखपत्रही नव्हते. त्यामुळे भूमा़फि यांनीच सोसायटीच्या ओपन स्पेसवर अतिक्रमण करण्यास माणसे पाठवली असा आरोप नागरिकांनी केला.