Wed, Dec 19, 2018 21:01



होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दगडफेकीनंतर जमावबंदी लागू; ३ पोलिस जखमी  

औरंगाबाद : दगडफेकीनंतर जमावबंदी लागू; ३ पोलिस जखमी  

Published On: Jan 02 2018 2:47PM | Last Updated: Jan 02 2018 2:47PM

बुकमार्क करा




औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर परिसरात दगडफेक झाली. या दगडफेकीत ३ पोलीस जखमी झाले. गोदावरी शाळा, सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर येथे मंगळवारी सकाळी जमावकडून दोन वाहने पेटवण्यात आली व रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मारहाणदेखील करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. दरम्यान, दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

शहरात बाजारपेठ शैक्षणिक संस्था बंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा, प्रात्याक्षिक रद्द केले आहे. पोलिस आयुक्तांनी कुलसचिवांशी चर्चा करून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. यावर परीक्षा विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच प्रशासकीय कामकाज ही बंद करण्यात आल आहे. शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा, बहुतेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

एसटी'चा चक्का जाम, प्रवाशांचे हाल

आमखास मैदान येथे सकाळी बस फोडीच्या घटनेनंतर सकाळी ७ वाजेपासून मध्यवर्ती बसस्थानकात वाहतूक थांबविण्यात आली. पोलिसांच्या मदतीने बस सेवा सुरळीत केली जात आहे,परंतु बसस्थानकात बसच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळपासून बसथनकात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. एसटीत आणि बसस्थानकात प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. स्थानकावरून जाणाऱ्या बहुतेक बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

४ हजार पोलिस; SRPF च्या ३ तुकड्या बंदोबस्तासाठी

क्रांती चौकात जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी रायफल मधून तीन राउंड हवेत फायरिंग केले. वाहतुक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सीडी देवगण,  पोलिस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या उपस्थितीत ही फायरिंग करण्यात आली. आंबेडकर नगर मध्ये पोलिस निरिक्षक शिवाजी कांबळे यांनी पेट्रोल बॉम्ब निकामी केला. शहरात अंदाजे 4 हजार पोलीस आणि SRPFच्या 3 तुकड्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.