Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Aurangabad › औरंगाबादपेक्षाही अमेरिकेत जमीन स्वस्त

औरंगाबादपेक्षाही अमेरिकेत जमीन स्वस्त

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 18 2018 12:46AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना हे छोटेसे राज्य. मात्र, येथे 40 देशांतील 1200 हून अधिक उद्योग सुरू आहेत. जगभरातील नामांकित कंपन्या तेथे कार्यरत आहेत. औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींपेक्षा स्वस्त जमीन, कामगार संघटनांचा नसणारा त्रास आणि सरकारचे धोरण यामुळे तेथे गुंतवणूक करा, असे आवाहन कॅरिलोनाच्या वाणिज्य विभागाचे संचालक तरुण गुप्ता यांनी मंगळवारी येथे केले. 

दक्षिण कॅरोलिनामध्ये उद्योग सुरू करण्याची माहिती देण्यासाठी तेथील अमेरिका सरकारच्या वाणिज्य विभागाअंतर्गत येणार्‍या भारतीय कार्यालयाचे संचालक तरुण गुप्ता आणि सिमरन यांनी उद्योजकांशी चर्चा केली. सीएमआयचे माजी अध्यक्ष आशिष गर्दे या वेळी उपस्थित होते. तरुण गुप्ता म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या दक्षिण कॅरोलिना अमेरिकेतील 43 व्या क्रमांकावर असून, लोकसंख्या 50 लाख आहे. एवढे छोटे राज्य असतानाही येथे 40 देशांतील 12 हजार कंपन्या कार्यरत आहेत. त्यात प्रामुख्याने बॉश, बीएमडब्ल्यू, होंडा, व्होवो, मर्सिडीझ बेन्झ, एसकेएफ, बोईंग, जीई एव्हीएशन आदींचा समावेश आहे. दक्षिण कॅरोलिनामध्ये टेक्स्टाईल, ऑटोमोबाइल, एअरोस्पेस आणि निर्मिती क्षेत्रातील उद्योगांमध्ये विस्ताराची संधी आहे.

Tags : Aurangabad, America,  land, cheap,  comparison, Aurangabad