Tue, Sep 25, 2018 06:38होमपेज › Aurangabad › अनैतिक संबंधातून निघृण हत्‍या

अनैतिक संबंधातून निघृण हत्‍या

Published On: May 21 2018 2:38PM | Last Updated: May 21 2018 2:38PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

अनैतिक संबंधातून सुपारी घेऊन एकाची हत्या करण्यात आली. ही हत्या एवढ्या क्रूरपण करण्यात आली आहे की, आरोपींनी मृताचे लैंगिक अवयवावर निघृणपणे वार केले आहेत, पोटातील आतडे बाहेर काढले आणि त्यात दगड भरून मृताला दौलताबाद येथील मोमबत्ता तलावाजवळील पाणीपुरवठ्याची विहिरीत फेकून दिले. 

रविवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला होता. यामध्ये दोन आरोपींना अटक केली असून अलीमोद्दीन उर्फ अलीम आणि बाबा लोली अशी त्यांची नावे आहेत. अडीच लाखाची सुपारी घेतल्याची चर्चा आहे. 
महत्वाचे म्हणजे आरोपीनेच एका पोलिस निरीक्षकालाला खून केल्याची माहिती दिली, त्यानंतर मृतदेहाचा शोध सुरू झाला होता.